भोकरी येथे गोरगरिब लोकांना अतिक्रमण जागा मिळावी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन (रावेर प्रतिनिधि )रावेर तालुव्यातील भोकरी येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गट क्र १५ सरकार गुरुचरित्र ४५ आर, ही जागा शासनाची असुन सदरील जागावर भोकरी येथील गोरगरिब नागरीक हे गेल्या ३० ते ४० वर्षापासुन वास्तवस आहे, व राहात असुन वारंवार मागणी करुन सुधा ही अतिक्रमण जागा गोरगरिब नागरिकाना देणयात आलेली नाही किंवा नमुना ८ मध्ये समाविष्ट केलेला नाही या मागणीचे निवेदन आज दि २३ रोजी संविधान आर्मी चे जिल्हाअध्यक्ष अशोक भाऊ अटकळे यांच्या उपस्थितीत व अतिक्रमणधारक यांनी रावेर येथे तहसीलदार श्री बंडु कापसे व पंचायत समिति चे गटविकास अधिकारी मेढे साहेब यांना निवेदन देणयात आले आहे व शासनाना कडे मागणी करण्यात आली की या गोरगरिब नागरिकाना लवकरच लवकर अतिक्रमण जागा मिळावी सदरील जागेचा शासनाचा नजराणा भरणयास सदरील अतिक्रमणधारक तयार आहे,जेणे करुन या गोरगरिब यांना या जागावर घरकुलांचा लाभ मिळवता येईल अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे, या प्रसंगी संविधान आर्मी चे जिल्हाअध्यक्ष अशोक भाऊ अटकळे अज्जु तडवी, सलीम तडवी,मजीद तडवी, आदि कार्यकर्ता व महिला पुरुष मोठया संख्याने उपस्थित होते

भोकरी येथे गोरगरिब लोकांना अतिक्रमण जागा मिळावी,  तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन       
Previous Post Next Post