दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी समावेशित शिक्षण, शिक्षण विभाग पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत विशेष विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव पि.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, समुद्रपूर येथे साजरा करण्यात आला.*

🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
       *दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी समावेशित शिक्षण, शिक्षण विभाग पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत विशेष विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव पि.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, समुद्रपूर येथे साजरा करण्यात आला.* 

जेष्ठ पत्रकार अब्दुलकदीर विदर्भ मराठवाडा संपादक 

    महोत्सवामध्ये सकाळी 9.00 वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, 10.30 वाजता दिव्यांग विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळी काढून आपल्या कलेचे उत्तम प्रदर्शन केले. दुपारी 12.00 वाजता पासून दिव्यांग विद्यार्थ्यांचे एकल नृत्य, सामूहिक नृत्य, वेशभूषा असे सादरीकरण झाले. यामध्ये संपूर्ण तालुक्यातील विविध दिव्यांग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांचा परिचय करून दिला. 
     सदर कार्यक्रमामुळे दिव्यांग व्यक्तीबाबत समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदल होण्यास फार मोठी मदत मिळते. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा एक व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या अंगी असलेले अदृश्य गुण सुद्धा समाजाच्या नजरेस पडतात. व समाज त्यांना आपल्यातीलच एक घटक म्हणून स्वीकार करतो. 
     कार्यक्रमाचे अध्यक्षपद शिक्षण विभाग पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. अशोकजी गीद्देवार यांनी भूषवले, तर श्री प्रफुलजी घोडे, (विस्तार अधिकारी शिक्षण) प्रदीपजी कावळे, (विस्तार अधिकारी शिक्षण) श्री अशोकजी आडे, (केंद्रप्रमुख) श्री निमसडे, (शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष) श्री नाखले सर,(मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,समुद्रपूर) हे व्यासपीठावर उपस्थित होते. 
     *तर डॉ. रूपलजी कोठारी (फिजिओथेरपिस्ट) व डॉ. कोठारी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. दिव्यांग विद्यार्थ्यांची शारीरिक अडचण व त्याची सोडवणूक करण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास करण्याबाबत डॉ .रुपलजी कोठारी मॅडम यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना व उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तर डॉक्टर कोठारी यांनी सुद्धा कर्करोगाबद्दलच उपस्थितांचे विशेष मार्गदर्शन करून कर्करोग मुक्ती बाबत समाजकार्य करण्यास प्रेरित केले. व दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा समाजात योग्य सन्मान मिळावा याबाबत प्रयत्न करण्याबाबत सुचवले.* 

      या महोत्सवामध्ये कोणत्याच विद्यार्थ्याला किंवा स्पर्धकाला प्रथम, द्वितीय किंवा तृतीय अशी श्रेणी न देता उपस्थित सर्वच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषकाचे वितरण करण्यात आले हे विशेष. 
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री रजनीश कोठारे, तालुका समन्वयक समावेशीत शिक्षण, पंचायत समिती समुद्रपूर यांनी व त्यांची चमू श्री गजानन वैद्य, श्री राजेश हजारे, श्री विकास पाटील, श्री अनिल राऊत, श्री. अमोल कावळे, सौ. सेजल साखरे, कु. वैशाली वंगळ, कु. स्वाती काळे, श्री. जॉय भोयर या सर्व केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. 
    *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप वाघमारे व श्री सागर गजभिये या केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांनी केले तर केंद्रस्तरीय विशेष शिक्षिका कु. पल्लवी दुरुगकर यांनी आभार व्यक्त केले.*
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
Previous Post Next Post