*बसवेश्वर महाविद्यालयाचे घवघवीत यश दीपराज रोडे विज्ञान शाखेतून तर श्रुतिका मगर वाणिज्य शाखेतून तालुक्यात सर्वप्रथम*
(मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण )
———————————
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात रामेटाकळी येथील महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही आपले वर्चस्व कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी दीपराज मुंजा रोडे याने विज्ञान शाखेतून ८९.८३% गुण मिळवून तसेच श्रुतिका रावसाहेब मगर हिने वाणिज्य शाखेतून ९२.८३% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
महाविद्यालयाचा एकूण निकाल उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी शिक्षणात घेतलेली ही झेप कौतुकास्पद ठरली आहे. शाखानिहाय यशस्वी ठरलेले गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:
विज्ञान शाखा:
१. दीपराज मुंजा रोडे – ८९.८३%
२. आयुषी शाम लाटकर – ८४.५९%
३. बीबी आयेशा अ. मुकीत अन्सारी – ८०.८३%
कला शाखा:
१. सलोनी भिकाजी कटके – ७६.६७% (प्रथम)
२. स्वाती रघुनाथ आरनुळे – ६७.६७% (द्वितीय)
३. कोमल शरद पवार – ६५.१७% (तृतीय)
वाणिज्य शाखा:
१. श्रुतिका रावसाहेब मगर – ९२.८३% (प्रथम)
२. गौरी अशोक वरडे – ७२%
३. अंकिता शंकर हारकळ – ६२%
शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द :
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रचंड गुणवत्ता असते, तिला केवळ योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे, अशा शब्दांत महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मानवत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राधाकिशन तोष्णीवाल यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून परिसरातील शैक्षणिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन :
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी राधाकिशन तोष्णीवाल, संस्थापक अध्यक्ष श्री. शांतलिंग काळे सर, संचालक श्री. रितेश काळे (जिल्हा परिषद सदस्य, परभणी), संचालक काशिनाथ शिंदे, उपाध्यक्ष राजेभाऊ डुकरे, संचालक आत्मलिंग काजळे, प्राचार्य पाठक एल. बी., प्रा. जोजारे आर. एस., प्रा. तळेकर एस. ए., प्रा. कदम बी. एस., प्रा. यादव व्हि. एस., प्रा. सोगे आर. बी., प्रा. नखाते आर. पी., प्रा. डाके ए. ए., श्री. कोकाटे एन. डी., श्रीमती गोखले संघप्रिया तसेच श्री. संदीप कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

