हिंगनी च्या कराटे पटूंची जिल्हा स्तरीय स्पर्धेत भरारी ..l

हिंगनी च्या कराटे पटूंची जिल्हा स्तरीय स्पर्धेत भरारी ..l

मीडिया पोलीस टाईम 
राजू कांबळे 
वर्धा नागपूर विभागीय प्रतिनिधी 

वर्धा. : नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर व जुनिअर कराटे चॅम्पियनशिप 2026 कराटे डो स्पोर्ट असोसिएशन वर्धा तर्फे शिव वैभव कॉलेज वर्धा येथे कराटे स्पर्धा घेण्यात आली होती. 

 या कराटे चॅम्पियनशिप मध्ये हिंगणी येथील ज्यूत्सूकॉन कराटे इंटरनॅशनल मुंबई शाखा वर्धा उपशाखा हिंगणी  च्या कराटे पटूनी भरारी मारीत विजयश्रीत बाजी मारली. या मध्ये कराटे पटू असद सलीम शेख गोल्ड मेडल चा  मानकरी ठरला तर मुली मध्ये कु. रेवा सुधीर उरकुडकर ( सिल्वर), कु. आदिती श्याम रेवतकर (सिल्वर), कु. आरोही दिनकर कोटेंगे (सिल्वर) यांनी बाजी मारली. या सर्व कराटे पटूंची पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता ( नाशिक ) निवड झाली आहे. 

या सर्व खेळाडूंनी यशाचे श्रेय सेन्साई निलेश राऊत सर,(चीप जज ) शिहान मंगेश भोंगाडे सर ,(कराटे डो स्पोर्ट असो. वर्धा जिल्हा सचिव ) शिहान राजु एन. कांबळे सर (विदर्भ कराटे मुख्य प्रशिक्षक, वर्धा कराटे डो स्पोर्ट असोसिएशन - टेक्निकल डायरेक्टर), सेलू तालुका कराटे मुख्य प्रशिक्षक सेन्साई सलीम शेख सर आणि आई वडिलांना तसेच यशवंत हायस्कूल हिंगणी येथील सर्व शिक्षक वृंद, बुद्ध विहार कमिटी च्या सर्व पदाधिकारी वर्गाना देते. या सर्व कराटे पटूंचे सर्व हिंगणी नागरिकांनी कौतुक केले आहे.
Previous Post Next Post