यावल येथील सरस्वती विद्यामंदिर मधे व्यसनमुक्ती जागर आणि शपथ कार्यक्रम संपन्न.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२६
नशामुक्त भारत अभियान अंतर्गत दि.१७ ते २६ जून दरम्यान देशभरात सुरू असलेल्या जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताहाच्या निमित्ताने यावल येथील सरस्वती विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अमली पदार्थ सेवन न करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी.सी.ठाकूर,तर प्रमुख पाहुणे म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे जळगाव जिल्हा संघटक तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त असलेले प्रा.डॉ.दयाघन राणे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ.दयाघन राणे अमली पदार्थांच्या सेवनाच्या व्यसनांच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ. नरेंद्र महाले शालेय विद्यार्थी व व्यसनामुळे होणारे विविध आजार व त्या आजारांच्या शरीरावर परिणाम याविषयी माहिती दिली. तर अध्यक्षीय संबोधन करीत प्राचार्य बी.सी.ठाकूर सर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त निरामय आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या प्रसंगी प्राचार्य बी. सी.ठाकूर सर यांनी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेने पुरवलेली शपथ विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एम.गाजरे मॅडम यांनी,तर आभार ए.बी.शिंदे यांनी मानले.

