पोलीस कायद्यात नमूद नसलेले सहा.पोलीस निरीक्षक पद रद्द करुन पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांना पोलीस निरीक्षक (PI) या पदावर पदोन्नती देण्याची मागणी.

पोलीस कायद्यात नमूद नसलेले सहा.पोलीस निरीक्षक  पद रद्द करुन पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांना पोलीस निरीक्षक (PI) या पदावर पदोन्नती  देण्याची मागणी.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)


यावल दि.२७ 
महाराष्ट्र पोलीस कायद्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा ( API) उल्लेख नसल्यामुळे हे पद रद्द करून पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) यांना पोलीस निरीक्षक ( PI ) पदावर पदोन्नती देण्याची मागणी पोलीस बॉईज असोशियन जळगाव जिल्हा अध्यक्ष भूषण नगरे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दि.२५ जून २०२६ रोजी पोलीस बॉईज असोशियन महाराष्ट्र राज्य तर्फे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) या पदाचा उल्लेख पोलीस कायद्यामध्ये कोठेही करण्यात आलेला नाही. देशातील कोणत्याही राज्यातील पोलीस दलात तसेच केंद्र शासनातील पॅरा मिल्ट्री फोर्स ( केंद्रीय पोलीस बल ) / रेल्वे पोलीस दल (RPF) / केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) इत्यादी दलांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हे पद कोठेही कार्यरत नसून त्या-त्या दलात पुढीलप्रमाणे पदांच्या श्रेणीची स्थापना करण्यात आलेली आहे.

१) पहिली श्रेणी - कॉन्स्टेबल (PC) २) दूसरी श्रेणी हेड कॉन्स्टेबल (हवालदार), ३) तिसरी श्रेणी असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) ४) चौथी श्रेणी सब इन्स्पेक्टर / उपनिरीक्षक (SI) आणि मग यापुढे पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस उपअधिक्षक याप्रमाणे पदोन्नती दिली जाते. तर महाराष्ट्र पोलीस दलात कायद्याने पुढीलप्रमाणे खरी नियमावली ग्राह्य आहे.

१) पोलीस शिपाई (कॉन्स्टेबल) 
२) पोलीस हवालदार (हेड.कॉ.) ३) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जिल्हा (प्रपायथ्य) पोलीस उपनिरीक्षक (PSI) याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलाच्या पदांची निर्मिती मधून या पदांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हे पद विनाकारण घातले आहे जे की,पोलीस कायद्यात या पदाचा
कोठेही उल्लेख नाही.सध्या महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) कमीत
कमी ७ ते ८ वर्षांनंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी (API) पदोन्नती दिली जाते. आणि त्यानंतर परत ७ ते ८ वर्षांनी पोलीस निरीक्षक (PI) पदी पदोन्नती दिली जाते. त्यामुळे या कालावधीत काही अधिकारी सेवानिवृत्त होतात व त्यांचे पोलीस निरीक्षक पद बनण्याचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे गृह विभागाच्या या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिका-यांमध्ये असंतोषाची लाट पसरली असून त्यांच्यामध्ये प्रचंड चीड निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.आणि म्हणून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री साहेबांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन पोलीस बॉईज असोसिएशनच्या निवेदनाची दखल घ्यावी व पोलीस कायद्यानुसार पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हे पद कोठेही कार्यरत नसल्यामुळे कायमस्वरुपी बंद करावे आणि येणाऱ्या काळात पोलीस उपनिरीक्षकांची (PSI) त्यांच्या जेष्ठतेनुसार किंवा कार्यकाळानुसार डायरेक्टर पोलीस निरीक्षक (PI) पदी पदोन्नती देण्यात यावी अशी विनंती केली आहे निवेदनावर जिल्हाध्यक्ष भूषण पंढरीनाथ नगरे, उपाध्यक्ष हेमंत तावडे यांची स्वाक्षरी आहे.
Previous Post Next Post