मार्खेल पोलिसांची यांची उल्लेखनीय कामगिरी.
१.५७ लाखांचे ७ चोरीचे मोबाईल शोधून मालकांना परत
(पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर)
देगलूर : मरखेल पोलीस
ठाण्याने मोबाईल चोरी व हरवलेल्या मोबाईलच्या शोध मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत तब्बल १ लाख ५७ हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल हँडसेट शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात परत दिले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी (देगलूर) व रवी हुंडेकर, पोलीस निरीक्षक मरखेल विलास पवार पोलीस उपनिरीक्षक, पो.काँ. २८६४ नारायण वंगाले पो कों / ३२४ संदीप बोदेमवाड, पोलीस स्टेशन मरखेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन मरखेल जि. नांदेड विलास पवार, पोलीस कॉन्स्टेबल नारायण चांगले आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप देवकाते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १ जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत CEIR पोर्टलवर नोंद झालेल्या हरवलेल्या मोबाईलची माहिती तपासून IMEI ट्रॅकिंग तसेच विविध तांत्रिक साधनांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. या तपासादरम्यान विविध ठिकाणी वापरात असलेले ७मोबाईल शोधून जप्त करण्यात आले. त्यानंतर आवश्यक पडताळणी करून संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत १ लाख ५७ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.नागरिकांनी मोबाईल हरवल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसेच CEIR पोर्टलवर माहिती अपलोड करावी, असे आवाहन रवी हुंडेकर पोलीस निरीक्षक मरखेल यांच्याकडून करण्यात आले आहे.

