जिल्हा परिषद मुलांची शाळा, देगलूर येथे स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद मुलांची शाळा, देगलूर येथे स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न.

(पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी देगलूर नांदेड)

 देगलूर : स्वच्छ, सुंदर आणि
निरोगी देगलूर शहराच्या निर्मितीसाठी विविध स्तरावर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २४ जून रोजी जिल्हा परिषद मुलांची शाळा, देगलूर येथे विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, नगरपरिषद प्रशासन तसेच महिला कर्मचारी भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्वच्छता मोहिमेच्या वेळी देगलूर नगराध्यक्षा विजयमाला ताई टेकाळे, मुख्याधिकारी नीलमताई कांबळे, गट नेत्या उज्वला ताई पदमावार, सभापती रत्नमाला ताई कौरवार, नगरसेविका तोटावार ताई, ध्याडे ताई, अंजली ताई, मोरे ताई तसेच नगरपालिकेतील महिला कर्मचारी भगिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी शाळा परिसराची स्वच्छता करून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. स्वच्छता ही केवळ एक मोहीम नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. शाळा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली असून, परिसरातील नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले. देगलूर नगरपरिषदेच्या वतीने पुढील काळातही अशा विविध स्वच्छता व जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. स्वच्छता मोहिमेमुळे शाळा परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक झाला असून, उपस्थित सर्व मान्यवर आणि कर्मचारी भगिनींच्या सहभागामुळे उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Previous Post Next Post