अकोल्यात 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत एलसीबीची मोठी कारवाई; १५ गोवंशांची सुटका, ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त*
*
(अकोला मुख्य जिला प्रतिनिधि इमरान खान मीडिया
पोलिस टाईम)
अकोला:शहरातील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या १५ जखमी गोवंशांची स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून सुटका केली आहे. 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, २४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट येथे एका गोठ्यात गोवंश कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आले आहेत.माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने सदर गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत गोठ्याचा मालक मोहम्मद अदनान शेख इरफान (वय २०, रा. खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गोठ्याची झडती घेतली असता, तिथे अत्यंत निर्दयतेने आणि जखमी अवस्थेत कत्तलीसाठी बांधून ठेवलेले १५ गोऱ्हे आढळून आले. पोलिसांनी ४ लाख २० हजार रुपये किमतीचा हा सर्व मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या सर्व गोवंशांना तातडीने उपचारासाठी आणि संगोपनासाठी म्हैसपूर येथील 'आदर्श गोसेवा संस्थान' मध्ये दाखल करण्यात आले आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पो.नि. नितीन लेव्हरकर, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, पोलीस अंमलदार शेख हसन, अब्दुल माजीद, भास्कर थोत्रे, रवि खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन, श्रीकांत पातोंड आणि अमोल दिपके यांच्या पथकाने पार पाडली. *तस्करांवर कठोर कारवाई करणार: पोलीस अधीक्षक"अकोला शहर व जिल्ह्यात गोवंश तस्करी करणाऱ्यांवर कडक अंकुश ठेवला जाईल. कत्तलीसाठी गोवंशांची अवैध वाहतूक किंवा साठा करणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल."— श्री. अर्चित चांडक (पोलीस अधीक्षक, अकोला)*

