पत्रकारांना धमकवणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदारकीचा तात्काळ राजीनामा घ्या-स्वराज्य बहुउद्देशीय पत्रकार संस्थेकडून निषेध आंदोलन*

*पत्रकारांना धमकवणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदारकीचा तात्काळ राजीनामा घ्या-स्वराज्य बहुउद्देशीय पत्रकार संस्थेकडून निषेध आंदोलन*


(अकोला जिल्हा मुख्य जिला प्रतिनिधी इमरान खान) 


नांदुरा :-पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अन्यायाला वाचा फोडणे, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचविणे हा पत्रकाराचा धर्म आहे.तसेच सत्ताधारी असो वा विरोधक या सर्वांवर पत्रकारांचा वचक असतो.परंतु गेल्या दशकापासून पत्रकारांचा आवाज ह्या ना त्या कारणाने दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे.त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे जणू राजद्रोह मानला जाऊ लागला आहे.जो पत्रकार सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो त्याला पत्रकारिता क्षेत्रातूनच कायमचा हद्दपार करण्याचे अनेक उदाहरण आहेत.उदा.निखिल वागळे, रविश कुमार व इतर.या हाडाच्या पत्रकारांना सत्तेपुढे न झुकल्याची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे.त्यांना त्यांच्याच नामांकित वृत्तवाहिन्यांवरून दबावतंत्राचा वापर करून हद्दपार करण्यात आले.असे हाल पत्रकाराचे सुरू आहेत.हे एवढ्यावर थांबत नाही तर उठसुठ कोणीही पत्रकारांना शिवीगाळ करतो,धमकी देतो.पण ही वागणूक निदान लोक्रतिनिधींकडून मिळणे अपेक्षित नाही.आपल्या सत्ताधारी पक्षाचे खासदार जे एका जबाबदार पदावर आहेत.श्री संजय दिना पाटील यांनी काल २५ जून रोजी पत्रकारांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करून जीवाने मारून टाकायची धमकी दिली.असे लोक समाजासाठी घातक असून आपल्या प्रतिष्ठित पक्षाची सुद्धा प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत ठरत आहेत.असे खासदार संजय दिना पाटील यांना तातडीने पत्रकारांची जाहीर माफी मागायला भाग पाडावे व त्यांचा खासदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी स्वराज्य बहुउद्देशीय पत्रकार संस्थेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात करण्यात आली.तसेच २०१४ पूर्वी थोड जरी वक्तव्य चुकून तोंडून निघाले तरीही मुख्यमंत्री व गृहमंत्री अशा राज्यातील महत्त्वपूर्ण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले आहेत.व पत्रकारांना कधीच धमकविल्याचे ऐकिवात नाही❗अशी स्पष्ट टीप सदर निवेदनात नमूद आहे.यावेळी स्वराज्य बहुउद्देशीय पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर रमेश पाटील,संस्थापक उपाध्यक्ष किशोर इंगळे,संस्थापक कोषाध्यक्ष योगेश धोटे,ज्येष्ठ पत्रकार संतोष तायडे,भागवत दाभाडे,अमीन खान,पुरुषोत्तम भातूरकर,लक्ष्मण वक्टे,डॉ.सुधाकर अंमलकर साहेब,दिलीप कोल्हे,अमोल करुटले,देवेंद्र जयस्वाल,प्रशांत पाटील , प्रकाश खंडागळे व इतर बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.व सर्वांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
Previous Post Next Post