वर्धा शहर DB पाथकाची कारवाही-
दारु व मोटार सायलक सह 1,52,050/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
(-विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
➡️अप क्र. 871 /2026 कलम 65 (ई) (अ ) मदाका सह कलम 3(1),181,130/177 मो.वा.का.
➡️फिर्यादी – पो. हवा. अभिजित वाघमारे , वय 45 वर्ष, ब.नं. 1416, पोस्टे वर्धा शहर . मो.नं. 9850101416.
➡️आरोपी - निलेश धनराज सागर , वय 34 वर्ष रा.वरुड (सेवाग्राम) ता.जि. वर्धा.
➡️घटणास्थळ – हनुमान मंदिर जवळ,बोरगाव मेघे,वर्धा
➡️घटना.ता.वेळ – दिनांक -24/06/2026 रोजी चे 13/00 ते 13/30 वा चे दरम्यान
➡️मिळालेला माल – गावठी मोहा दारू व एक काळ्या रंगाची बुलेट क्र. MH32AY6941 असा
एकूण मुद्देमाल- 1,52,050/- रु
➡️हकीकत – या प्रमाणे आहे की पो.स्टे.परीसरात पेट्रोलिंग करित असतांना आम्हास मुखबिर कडुन माहीती मिळाली कि,सुपारी माता मंदिर रोड बोरगाव मेघे कडून एक इसम काळ्या रंगाची बुलेट गाडीवर दारू ची वाहतूक करीत आहे अश्या खबरे वरून बोरगाव मेघे हनुमान मंदिराजवळ नाकाबंदी करून एक इसम बुलेट घेऊन येताना दिसला त्यास पंचांसमक्ष थांबून नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव निलेश धनराज सागर वय 34 वर्ष रा.वरुड ता.जि.वर्धा असे सांगितले त्याची पोस्टाफ व पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळ अवैधरित्या गावठी मोहा दारू वाहतूक करतांना मिळून आल्याने सदर घटनास्थळ मौका जप्ती पंचनामा करुन दारू व मोटर सायकल पंचासमक्ष जप्त करुन सदर आरोपीस ताब्यात घेवुन पोस्टेला परत येवुन आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हि कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री सौरभ अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात वर्धा शहर पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार श्री विलास पाटील,पोलीस निरीक्षक यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार महेद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजीत वाघमारे, पोलीस अंमलदार रंजीत भुरसे, पोलीस अंमलदार अमोल साळवन तसेच होमगार्ड सैनिक राहुल मेहता यांनी केली....

