डॉ.अण्णा भाऊ साठे वाचनालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
(मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )
नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथे,डॉ.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका वाचनालयात, बहुजनाचे राजे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांची जयंती, मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प ठेऊन अभिवादन केले, यावेळी उपस्थित पत्रकार राजेश अमेटवार,व लघुळ येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील लघुळकर,व लघुळ चे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते गौस पठाण,व विक्रम गुज्जलवाड, व वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार यांनी, राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, छत्रपती शाहू महाराज हे बहुजनाचे राजे असून त्यांनी शिक्षणासाठी त्यांच्या राज्यामध्ये त्या काळात महाराजांनी गोरगरिबांसाठी खूप मोठी शिक्षण साधने व वस्तीगृह उभे केले, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह उभे केले, छत्रपती शाहू महाराजांनी इथल्या वंचित घटकातील लोकांना सामान्य हक, व न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले, व महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य छत्रपती शाहू महाराजांनी पुढे नेले, व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मोठी मदतही केले त्यामुळे, आपल्या राजाला आपण आज वाचनालयामध्ये अभिवादन करून छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत,या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व सर्व जनतेला शुभेच्छा दिले.

